लग्नापूर्वी कधी फारशी इंटरेस्टिंग न वाटलेली पण आता मात्र आवडीने खाल्ली जाणारी: उकडपेंडी!
उ.पे. कोणाच्या हातची खावी तर ती माझ्या आईच्या Anagha Melag च्या हातचीच. आजही मावश्या आईला आवर्जून उ.पे. ची फर्माईश करतात. मस्त खमंग भाजलेली, लसूण मिरचीची झणझणीत फोडणी दिलेली आणि वरून कच्चा कांदा व कोथिंबीर घालून सजवलेली ही उकडपेंडी म्हणजे अक्षरशः comfort food असते. पोटभरीची, तशीच पट्कन होणारी अन् पौष्टिक... मी पण करते अधूनमधून नाष्ट्यामध्ये, मात्र आईच्या हातची सर येत नाही. पण त्या वाफाळत्या उकडपेंडी मध्ये आईच्या मायेची ऊब जाणवते अन् पोट नी मन तृप्त होतात!
©Kirti Padhye
Sunday, March 17, 2019
उकडपेंडी
Subscribe to:
Posts (Atom)